चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.
चार जणांची आई बाजेवर जीव जाई जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.
चिंता परा येई घरा दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते.
चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.
चोर सोडून संन्याशालाच फाशी खर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.
चोराच्या उलट्या बोंबा स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.
चोरावर मोर एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.
चोरांच्या हातची लंगोटी ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे.
चोराची पावली चोराला ठाऊक वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
चोराच्या मनात चांदणे वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते.
चालत्या गाडीला खीळ व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
जशी देणावळ तशी धुणावळ मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
जलात राहून माशाशी वैर करू नये ज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.
जळतं घर भाड्याने कोण घेणार ? नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?
जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.
जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे.
जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे.
जे न देखे रवि ते देखे कवी जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.
जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते.
ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
ज्याच्या हाती ससा, तो पारधी ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.
ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.
झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग नेहमी झाकून ठेवावे.
No comments:
Post a Comment