Saturday, 16 January 2021

म्हणी ८

टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही.
डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो.
ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.
तळे राखील तो पाणी चाखील ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच.
तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे अगदी उलट गुणधर्म दिसणे.
तट्टाला टूमणी, तेजीला इशारत जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.
ताकापुरते रामायण एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.
तीन दगडात त्रिभुवन आठवते संसार केल्यावरच खरे मर्म कळते.
तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.
तुकारामबुवांची मेख न सुटणारी गोष्ट
तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.
तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
तेरड्याचा रंग तीन दिवस कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.
तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे खायला पुढे कामाला मागे.
थेंबे थेंबे तळे साचे दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.
थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.
दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.
दस की लकडी एक्का बोजा प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.
दहा गेले, पाच उरले आयुष्य कमी उरणे.
दात कोरून पोट भरत नाही मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.
दाम करी काम, बिवी करी सलाम पैसे खर्च केले की कोणतेही काम होते.
दाखविलं सोनं हसे मुल तान्हं पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.
दिल चंगा तो कथौटी में गंगा आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते.
दिव्याखाली अंधार मोठ्या माणसातदेखील दोष असतो.
दिल्ली तो बहुत दूर है झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.
दिवस बुडाला मजूर उडाला रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.
दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.
दुभत्या गाईच्या लाथा गोड ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.
दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.
देश तसा वेश परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.
देव तारी त्याला कोण मारी ? देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.
देखल्या देवा दंडवत सहज दिसले म्हणून चौकशी करणे.
देणे कुसळांचे घेणे मुसळाचे पैसे कमी आणि काम जास्त.
देवा दंडवत एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.
दैव देते आणि कर्म नेते नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.
दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.
दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे
दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.
दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.
दृष्टीआड सृष्टी आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.
धर्म करता कर्म उभे राहते एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.
धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी कोणत्याच कामाचे नसणे.
धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे.
धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.

No comments:

Post a Comment