21 आलीया भोगाशी असावे सादर कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
22 अचाट खाणे मसणात जाणे खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
23 आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
24 आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
25 आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
26 अळी मिळी गुप चिळी रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
27 अहो रूपम अहो ध्वनी एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
28 इच्छा तेथे मार्ग एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
29 इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
30 उठता लाथ बसता बुकी प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
31 उडत्या पाखरची पिसे मोजणे अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
32 उधारीचे पोते सव्वाहात रिते उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
33 उंदराला मांजर साक्ष वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
34 उचलली जीभ लावली टाळ्याला विचार न करता बोलणे.
35 उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
36 उथळ पाण्याला खळखळाट फार थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
37 उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
38 एक ना घड भारभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
39 एका माळेचे मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची.
40 एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
No comments:
Post a Comment