1 अगं अगं म्हशी मला कोठे नेशी स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2 आपला हात जगन्नाथ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
3 अति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो.
4 आयत्या बिळात नागोबा दुसर्याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
5 आईजीच्या जीवावर बाईजी उदार दुसर्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
6 आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे.
7 आंधळे दळते कुत्रं पीठ खाते एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
8 आधी पोटोबा मग विठ्ठोबा आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.
9 अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
10 आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
11 अति शहाणा त्याचा बैल रिकामा जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
12 आधी शिदोरी मग जेजूरी आधी भोजन मग देवपूजा
13 असतील शिते तर जमतील भुते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
14 आचार भ्रष्टी सदा कष्टी ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
15 आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
16 आईचा काळ बायकोचा मवाळ आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
17 आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
18 आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
19 अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
20 आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
No comments:
Post a Comment