करावे तसे भरावे जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.
कर नाही त्याला डर कशाला ? ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?
करीन ते पूर्व मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.
करुन करुन भागला, देवध्यानी लागला भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.
कणगीत दाणा तर भिल उताणा गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.
कधी तुपाशी तर कधी उपाशी सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.
कशात-काय-अन-फाटक्यात-पाय वाईटात आणखी वाईट घडणे
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.
काडीचोर तो माडीचोर एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे.
काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.
का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ निरर्थक गोष्टींची काळजी करणे.
कानात बुगडी, गावात फुगडी आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.
काल महिला आणि आज पितर झाला अतिशय उतावळेपणाची वृत्ती.
काकडीची चोरी फाशीची शिक्षा अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
मल्हारी माहात्म्य नको तिथे नको ती गोष्ट करणे.
काना मागुन आली आणि तिखट झाली श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.
कामापुरता मामा आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.
कावळा बसला आणि फांदी तुटली परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे
काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे
काप गेले नी भोके राहिली वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.
काळ आला; पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे मूळचा स्वभाव बदलत नाही.
कुडी तशी फोडी देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
केळीला नारळी अन घर चंद्रमौळी अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
केस उपटल्याने का मढे हलके होते ? जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.
केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
कोळसा उगाळावा तितका काळाच वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
कोल्हा काकडीला राजी लहान लहान गोष्टींनी खुश होतात.
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे
No comments:
Post a Comment