Saturday, 16 January 2021

म्हणी ४

एका माळेचे मणी सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.
एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.
एक ना धड भाराभर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
एकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.
एका पिसाने मोर होत नाही थोड्याश्या यशाने हुरळून जाणे
एका खांबावर द्वारका एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य
एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.
ऐंशी तेथे पंचाऐंशी अतिशय उधळेपणाची कृती.
ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.
ओळखीचा चोर जीवे न सोडली ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.
ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.
ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे? सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.
औटघटकेचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट.

No comments:

Post a Comment