Tuesday, 27 April 2021

मुर्खोपनिषद-१

(कदाचित माझी ही वटवट/टंकनावट मूर्ख असू शकते म्हणून मुर्खोपनिषद असे शीर्षक दिले आहे. वाचकांनी विपर्यास करून घेऊ नये ही विनंती.)

जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।।

हे जरी खरं असलं तरीही आपणास ज्ञात असलेलं, प्राप्त झालेलं इतरांना सांगण्यापूर्वी त्याची शहानिशा करावी. अर्धवट इतरांना सांगू नये ही साधी गोष्ट आहे; पण हे कळलं तरी वळत नाही म्हणूनच काही लोकांकडून घाई होते. त्यामुळे स्वतःबरोबरच इतरांच्या अज्ञानात ते भर घालण्याचं काम करतात. हा अट्टहास कशासाठी?
माझं ते खरं म्हणणाऱ्यांपैकी ते असतात. या ऐवजी खरं ते माझं ही नीती अवलंबायला हवी. जाहिरात हा आपल्या कृतींचा, विचारांचा तोंडवळा असतो. त्यावरून आपल्या कृतीच्या/निर्मितीच्या गुणवत्तेची परीक्षा होत असते. यासाठी ती अस्सल, बिनचूक असायलाच हवी.

जे आपणासी न ठावे। ते जाणत्यांना विचारावे।    शहाणपण वाढवावे। स्वहिताकरिता।।


No comments:

Post a Comment