Sunday, 2 May 2021

विचार मंथन-५० बुद्धिमत्ता

  
       सातत्याने प्रयत्न करत राहणे हे यशाचे गमक आहे. अनुवंशाने नैसर्गिकरित्या मिळालेली बुद्धिमत्ता आणि सहवासाने मिळालेली परिस्थिती यातून व्यक्तिमत्व घडत जाते. 
         बुद्धिमत्ता कोणत्याही औषधाने, मात्रेने वाढवता येत नाही; मात्र उपलब्ध आहे त्या बुद्धिमत्तेचा अधिकाधिक वापर करून आपण यश व गुणवत्ता मिळू शकतो. निरीक्षण, वाचन आणि स्वानुभवातून हा वापर वाढत असतो.     
          सर्वसामान्य मनुष्य आपणास मिळालेल्या बुद्धिमत्तेचा १.२५ ते १.७५% इतकाच वापर करतो. 
          आईन्स्टाईन हा शास्त्रज्ञ म्हणतो की निसर्गदत्त मिळालेल्या बुद्धिमत्तेपैकी केवळ २.२५ % इतकीच बुद्धिमत्ता तो आयुष्यभर वापरू शकला.
          बुद्धिमत्तेचे १८०० पेक्षा अधिक घटक (प्रकार) आहेत. या सर्व घटकांचे आठ गटांमध्ये विभाजन केले आहे.(काही ठिकाणी बारा गट मानले आहेत.) भाषा, गणित, कला,  निसर्ग, अवकाश, आंतरव्यक्तीत्त्व, अंतर्गत व्यक्तीत्त्व आणि भावनिक यापैकी आपल्या बुद्धिमत्ता मध्ये कोणते घटक आहे हे ज्याने ओळखले व त्या घटकांचा उपयोग करून घेतला तो लवकर यशस्वी होतो. भावनिक बुद्धिमत्तेचा इतर सर्वच घटकांंशी सहसंबंध जोडलेेेेला असतो.
        साधारणपणे एकापेक्षा अधिक म्हणजे सात ते आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे उपयोगात आणतो त्याला अष्टपैलू म्हणतात आणि आठ पेक्षा अधिक बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या व्यक्तीला बहुआयामी व्यक्ती म्हणतात. आजपर्यंत विविध शास्त्रज्ञांनी ३६ प्रकारच्या बुद्धीमापनाचे तंत्र विकसित केले आहे. 
         

No comments:

Post a Comment