*_५१) जिथे प्रश्न तिथे उत्तर_*
मानवी मनाचा अफाट पसारा लक्षात घेता जीवनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात.
स्वतः निर्माण केलेले-इतरांमुळे निर्माण झालेले, कौटुंबिक-व्यावसायिक, आर्थिक-सामाजिक त्यांची अशी वर्गवारीही करता येईल.
यातील बरेचसे प्रश्न क्षुल्लक असतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी फारसे बिघडत नाही. काही मध्यम स्वरूपाचे असतात जे चुटकीसरशी सोडवता येतात आणि काही सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात; मात्र सुटणारच नाही असा प्रश्नच असू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातले प्रश्न सोडवण्यासाठी तत्परता ठेवली पाहिजे.
प्रश्नांचे गांभीर्य किंवा स्तर लक्षात न घेता प्रश्न निर्माण झाल्याबरोबरच घाबरगुंडी उडणारे नव्वद टक्के लोक असतात. उरलेल्या पैकी सात टक्के लोकांची स्थिती तळ्यात-मळ्यात असते आणि तीन टक्के लोक मात्र गांगरलेले असतात. आपला समावेश कोणत्या प्रकारच्या गटात होतो त्याचा प्रथम शोध घ्यावा.
भेटू या मालिकेतील पुढच्या भागात. जय जगत।
No comments:
Post a Comment