(कदाचित माझी ही वटवट/टंकनावट मूर्ख असू शकते म्हणून मुर्खोपनिषद असे शीर्षक दिले आहे. वाचकांनी विपर्यास करून घेऊ नये ही विनंती.)
व्हाट्सअपमध्ये आपण जतन केलेल्या किंवा आपण सहभागी असलेल्या समूहामधील कोणत्याही व्यक्तीला आपण वैयक्तिक संदेश पाठवू शकतो.
अधिकाधिक सदस्यांना एकाचवेळी संदेश पाठविता यावा यासाठी दोन प्रकारचे ग्रुप तयार करता येतात. पहिल्या प्रकारच्या ग्रुपला प्रसारण ग्रुप(Broadcasting Group) म्हणतात. असा प्रसारण ग्रुप आपण तयार केल्यास त्यातील सर्व सदस्यांना आपण एकाचवेळी संदेश पाठवू शकतो. या ग्रुपची मर्यादा २५६ व्यक्त्ती इतकी असते. हा प्रसारण ग्रुप असल्यामुळे त्यामध्ये इतरांच्या पोस्ट येत नाहीत.
साधारण ग्रुपमध्येही आपण जास्तीत जास्त २५६ व्यक्त्तींना समाविष्ट करू शकतो. या ग्रुपचा उद्देशही एकावेळी सर्वांना संदेश पाठवणे असा असतो पण काही लोक वैयक्तिक चॅटिंग अशा ग्रुपवर करत असतात त्यामुळे इतरांना विनाकारण जाच सोसावा लागतो. दोन व्यक्ती केव्हाही कुठेही आपापसात संवाद करू शकतात तो संवाद ग्रुपवर करण्याची आवश्यकता नसते. पण का करतात कुणास ठाऊक!
ग्रुपवर अशाप्रकारे खाजगी चँटिंग किंवा संवाद करणाऱ्या ग्रुपच्या एडमिनला एक दोन वेळ सूचना देऊनही जर ॲडमिन ने किंवा इतर सर्व सदस्यांनी असे संवाद थांबवले नाहीत तर त्या ग्रुप मधून बाहेर पडणे पसंत असते.
अशा ग्रुपवरील एखादी पोस्ट आपणास आवडल्यास आपण एखादा इमोजी टाकून भावना व्यक्त करू शकतो. पोस्ट बद्दल काही सूचना किंवा मार्गदर्शन करायचे असल्यास मात्र ते वैयक्तिक करणे चांगले. तेही येथूनच करता येते त्यासाठी आवडलेली किंवा नाव आवडलेली पोस्ट सिलेक्ट करावी आणि वरती तीन टिंम्बाना
स्पर्श केल्यानंतर (Reply Privately) हा ऑप्शन निवडला तर आपला अभिप्राय वैयक्तिक त्या पोस्ट टाकणाऱ्या कडे जातो.
तसेच चुकून गेलेली पोस्ट सर्वांच्या मोबाईल मधून काढून टाकण्यासाठी एक तासाच्या आत पुढील कृती केल्यास ती पोस्ट निघून जाते.
नको असलेली किंवा चुकून गेलेली पोस्ट सिलेक्ट करावी वरचा डिलीट डिलीट ऑप्शन टच करावा
https://youtu.be/5NuXXzi8gPA
No comments:
Post a Comment