(Give Away या कवितेचा मुक्तानुवाद)
. सोडून द्यावं
सोडून द्यावं.
मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे
निर्णय घेत असतील, तर पाठीमागे लागणं
सोडून द्यावं.
मोजक्याच लोकांशी ऋणानुबंध जुळतात. एखाद्याशी नाही पटलं, तर बिघडलं कुठं
सोडून द्यावं.
एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं
सोडून द्यावं.
आपल्या हातात काही नाही, हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं
सोडून द्यावं.
इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागलं तर स्वतःकडून अपेक्षा करणं
सोडून द्यावं.
प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हणतो तुलना करणं
सोडून द्यावं
आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमा खर्चाची मांडणी करणं
सोडून द्यावं
समजलं तर ठीक नाहीतर
हेही सोडून द्यावं.
. Give away
If someone do'nt hear after twice to tell him something
Give away
When our bigger children think independent to follow them
Give away
Few friends are mature then someone
Give away
When we became senior after that to teasers
Give away
When you know nothing is in our hand to think about others and future
Give away
When there were so far distance between wish and possibility to by yourself
Give away
Everything has her own shape, colour and beauty, so to compare
Give away
When you have lot of experiences to detail debit-credit
Give away
If you won't know these well
Give away
_____ Waiter Moon
Nice, meaning full poem and you have done great work to translate it in to marathi....
ReplyDelete