विचारमंथन
जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करावेच लागतात. कष्टाविना मिळालेला जय हा पराजयाचाच दुसरा अवतार असतो. त्यासाठी कुणाचा तरी बळी गेलेल्या असतो. याची फोडणी मनाला सतत होत राहते.
यासाठी कुणाच्या दयेची भीक मिळण्याची अपेक्षा न बाळगता जो अपयशाच्या प्रत्येक पायरीवर कारणे शोधून त्यावर मात करतो तो अखेर यश प्राप्त करतो.
यश हे प्रयत्नांचे फळ असते, कीर्ती हा सद्गुणांचा परिपाक असतो आणि सन्मान हे कीर्तीचे शिखर असते. असे सर्वोच्च शिखर प्राप्त झाले तरी ज्याला गर्व होत नाही; अपमानाने जो क्रोधीत होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरीही जो कठोर शब्द उच्चारून अहंकाराचा बळी ठरत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ होय.
No comments:
Post a Comment