. *मला अजून कळलं नाही*
उद्योग, बाजार, रहदारी, वाहतूक, प्रवास, शिक्षण या सर्व व्यवहारावर मर्यादा आल्या. कडकडीत बंद, अंशत: बंद, काही अटींवर/सवलतीत व्यवहार चालू झाले. ठीक आहे.
आम्ही नियम पाळले. काही लोकांनी तोडले. दंडही भरला.
पण...
जीवनावश्यक सेवांना काही मर्यादित वेळेची सवलत दिली. या गरजा सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांनाच असतात. दुकाने ठराविक वेळेत चालू असतात. अशावेळी आपल्या गरजेनुसार खरेदीसाठी लोक जातातच.
ठराविकक वेळेतच दुकाने चालू असल्यामुळे सर्व लोक त्याच वेळेत दुकानात जातात. यामुळे गर्दी आणि विषाणूंचा प्रसार जास्त होतो...
की पूर्ण वेळ
दुकाने चालू ठेवल्यामुळे
गर्दी आणि विषाणूंचा प्रसार जास्त होतो?
मलाा... अजूनही... कळले नाही!*
No comments:
Post a Comment