Sunday, 30 May 2021

*मुख्रोपनिषद-५*


*शूदलेखण*
*आमाला* टाळी आणि नमस्कार यातला फरक कळत नाही. प्रमाणलेखन राहू दे; शुद्धलेखनही जमत नाही. खऱ्याचा *खर्या* झाला तर काय *बिघडल? शुद्धचे *शुध्द* झाले तर तुमच्या दाताखालील भाताच्या घासात खडा लागल्यासारखे का पिसाळता. गप *रहावा.* भावना तर *शुध्द* आहेत ना! 
काही लोकांना कुसळ दाखविण्याचा भारी नाद. जर इतका वैताग *एत* *आशेल* तर वाचताच कशाला आमच्या *पोश्ट*? 
*मात्रूभाषा* म्हणवून घेत *अषुध्द* *लिहीणे* हा आमचा *जल्मसिध्द* हक्क आहे.
*आणि आभीव्यक्ती स्वातंतर्याचे* काय गोडवे गाता? *सरस्वतीन* अनुस्वार खायचेही हक्क *आह्माला* दिलेत *कि* राव!
*नीमूटपने* वाचत चला. *आमच आभीनंदन करा. आर्शीवाद दया. नाहितर अमचा णाध सोढा. तुमच वाचनच आशुध्द* उगा कशाला आमची *कापड काडता?*
*हि* शेवटची *ताकीत. पुह्ना आसकाय घडल तर्र* याद राखा. 
*आमाला गूगलणच किबोरड* खराब दिलाय. यात आमचा काय *दोश?*

No comments:

Post a Comment