Monday, 31 May 2021

क्षमापत्र

आपण

वयाने, अनुभवाने व मानानेही
ज्येष्ठ आहात
म्हणून माझा कान पकडण्याचा अधिकार आपणास आहे.
        शुद्धलेखनाचे *चला सुधारू आपले लेखन- भाग १ ते ६*
*मिसप्रिंट-१ ते १६१ भाग*
माझ्या संपर्कातील मित्रांसाठी शिक्षणयात्रा व्हाॅटसप, फेसबुक, ब्लाॅगवर आणि यू-ट्युब चॅनेलवर  तयार करून पाठवले आहेत.
आजही ते उपलब्ध आहेत.
असंख्य मित्रांनी त्यांचे अनुसरण केले आहे.
        सामाजिक माध्यमातील *'व्हाॅटसप स्टेटस', *फेसबुक स्टोरी', 'यू-ट्युब' आणि 'ब्लाॅग'* हे प्रकार कुणाच्याही माथी मारले जात नाहीत. ज्याची इच्छा असेल त्यांनीच पाहावेत असा संकेत आहे. कुणा एकाच्या नावाने अपमान करण्यासाठी, हिनवण्यासाठी या गोष्टी लिहिल्या नाहीत.
       काही औषधं कडू असतात. ती अनारोग्य असलेल्यांसाठी असतात. सरसकट कोणालाही दिली जात नाहीत.
       आजवर देश-विदेशातील माझ्या संपर्कातील मराठी जाणणाऱ्या ५७८१ लोकांनी हे पाहिले आहे.
       भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी या माध्यमांचा उपयोग केला जातो.
       *तरीही आपले मन दुखावले असेल, माझी फाऽऽऽर मोठी चूक झाली असे वाटत असेल, आपणास हा प्रकार गैर वाटला असेल तर क्षमस्व.*
           आपला ऋणाईत
                  चंद्रकांत

No comments:

Post a Comment