बत्तीशी, दंतमंजन आणि पेस्ट
दात घासणे हे तसे दररोजचे आवश्यक काम. पूर्वी मीठ, कोळसा, तुरटीच्या दंतमंजनाने किंवा बाभूळ, कडुनिंब, मोगली एरंडाच्या ताज्या सालीनेही हे दंतधावन आम्ही उरकत असू.
आता पेस्टने. बत्तीस दातांसाठी हीऽऽऽ एवढी ब्रश भरून पेस्ट मुळीच गरजेची नाही. (पेस्टच्या एजन्सी असणाऱ्यांनी शिव्या घालू नयेत.) प्रसिद्ध दंतवैद्य डॉ. उपाध्ये (MDS) यांच्या सल्ल्यानुसार बत्तीस दातांसाठी वाटाण्याची पेस्ट पुरेशी आहे.
आणि उगाच तासभर घासाघीस करण्याचीही गरज नाही. तीन मिनिटांत हे स्वच्छतेचं काम उरकायला हवं.
आणि आपल्याला माहीत आहेच.
"जेवणापूर्वी धुवा हात
जेवणानतर दात"
अगदी सक्कासक्काळीच घासायला पाहिजेत असंही नाही. मात्र जेवणानंतर नसतील घासले; तर मात्र सकाळी नक्कीच घासू या.
No comments:
Post a Comment