Sunday, 20 June 2021

योगा-प्राणायाम आणि आसने : एक जीवनशैली


🔹आजचा 'विचारमंथन'  क्र.६२🔹
        *आपल्या भारत देशाने आयुर्वेद अध्यात्म, व योग या तीन गोष्टी जगाला दिल्या.*

        *आजच्या मानवी जीवनात आढळणारे तणावजन्य मनोकायिक रोग व मानसिक अस्वास्थ्य दूर करून शरीर-मनाचे स्वास्थ्य सांभाळणारे' योग' हे  शास्त्र कमालीचे प्रभावशाली ठरते आहे.*
      *आजकालच्या या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जेमतेम वेळ काढून आसन साधना करू पाहणाऱ्या  आपल्यासारख्या सर्व साधकांनी साधनेचे कर्मकांड न करता एक प्रामाणिक प्रयत्नाने, तज्ज्ञांच्या सल्ल्याने साधना सुरू ठेवली तर लाभ निश्चितच मिळतील शेवटी 'योग' ही एक जीवनशैली आहे. विचारशैली आहे. 

      आसने व प्राणायाम या मोडतील दोन प्रमुख क्रिया आहेत. आपल्यातल्या 'स्व'ला घडविण्यासाठी, ओळखण्यासाठी आसन हे एक केवळ माध्यम आहे. विचार, भावना व कृती यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी, व्यक्तिमत्व घडविण्यासाठी ही सारी साधना आहे. हा विचार प्रबळ झाला, तर आजकालच्या मनोकायिक विकारांवर  आसने प्रभावी ठरतील, यात काही शंका नाही.*
💐💐💐💐💐💐💐

No comments:

Post a Comment