लावणीत प्रेमाचीआर्तता
असते,आर्जव,असते,प्रियकराबद्दलची ओढ असते, त्यालाआकृष्ट करण्यासाठी विक्षेप असतात,भृकुटी भंगाची मनोवेधक हालचाल असते ,नेत्र पल्लविचा सांकेतिक आविष्कार असते,शब्दातून प्रकट होणारा शृंगार असतो,सुवरणाचे आभूषणे बनविण्याचे जसे कलाकाराचे कौशल्य असते तसे शब्दातून सौंदर्य निर्माण करण्याचे कसब लावणीकाराचे असते, देरे कान्हा चोळी अन लुगडी अशा लावणीतून जीवनातील अध्यात्म व्यक्त करण्याची ताकत ही असते,तर थकल्या भागाला जिवाला विरंगुळा असतो,अशी ही बहुगुणी बहुरूपी लावणी म्हणजे महाराष्ट्रातील जिवंत कला आहे,लावणीत सवाल जवाबातून लावणीकाराची बौद्धिक प्रगल्भताही दिसते,
म्हणूनच कवी संजीवांच्या अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया, पडला पदर तुझा खांदा दिसतो ग,कंबरेला कम्बरपट्टा कसतो, चाळ माझ्या पायात पाय माझे तालात या सारख्या अस्सल लावण्या रसिक श्रोत्यांना चाळीस वर्षांनंतर ही भुरळ पाडतात, बेहोष होऊन पटके उडवायला लावतात. डी के साहेब तुमच्या लावण्यातील लावण्याची ताकतही अशीच, दिसून येते.
- - - -
No comments:
Post a Comment