Monday, 1 November 2021

विनाशकाले

.       *विनाशकाले*

शहाणे सुरते अन्यायाचे
पाढे वाचू लागतात
सज्जनांच्या छाताडावर
भुते नाचू लागतात

निरागस आनंदाला
ग्रहणे लागू लागतात
आकाशात तेव्हा काळे
ढग साचू लागतात

कुरतडून कोवळी पिके
मुळे सुटू लागतात
साले उंदिर बिळे खोदून
राने खाचू लागतात

झिलईच्या रंगात रंगून
पऱ्या उडू लागतात
कुलवतीच्या गळ्यास सोन
सऱ्या जाचू लागतात

काळतोंडे स्वयंघोषित
दूत रावणनीतीचे
विनाशाच्या दिशेने
घोडे टाचू लागतात

वारे वाहतात उलटा काळ
फुले जळू लागतात
मखमली कळ्यांस नाजूक
काटे टोचू लागतात

सुखास पारख्या जनाचे
जन्म सडू लागतात
कल्पवृक्ष सुकून तिथे
काळे पाचू लागतात

             *🅲 रमेश*

No comments:

Post a Comment