*पोलीस अमलदार श्रीमती संगीता मारूती ढोले आधुनिक क्रांतिज्योती सावित्रीबाईं .*
----🙏🙏🙏----
[[ *भटकंती करणाऱ्या व शाळेचे तोंडही न पाहिलेल्या मुलांसाठी ड्युटी सांभाळून पालावरच्या शाळेच्या शिक्षिका*]]
----- 🙏🙏🙏-----
( *"प्रवास प्रकाशाकडे" नाव देऊन मुलांच्या आयुष्यात नवचैतन्य आणण्यासाठी ५० मुलांना रोज दोन तास पालात (तंबूत) शिकवितात*)
[{ *पालातील शिकणाऱ्या मुलांचे केस कापणाऱ्या देशातील पहिल्या खाकी वर्दीतील शिक्षिका*}]
{{ *पालातील मुलांच्या जीवनात ज्ञानाच्या पणत्या प्रज्वलित करणाऱ्या श्रीमती संगीता ढोले*}}
====================
*श्रीमती संगीता मारूती ढोले या वाशिम जिल्ह्यात पोलीस अंमलदार आहेत. करोना काळात त्यांची ड्युटी चेकपोष्टवर होती. चेकपोष्ट शेजारी पालात लहान लहान मुले बाहेर खेळत असलेली त्या पाहत होत्या. पालात जाऊन चौकशी करता या मुलांनी कधीच शाळेचे तोंड पाहिले नसल्याचे समजले. लहान मुले तंबाखू खात, सिगारेट ओढत असत. आठ आठ दिवस ती आंघोळ करत नसत.*
*पालावरच्या मुलांना एकत्र करून एप्रिल, २०२० पासून पालकांना व मुलांना समजावून सांगून, समुपदेशन करुन ६ मुलांच्यासोबत सुरु केलेल्या वर्गात सध्या ५० पेक्षा जास्त मुले आहेत.*
*मुलांना श्रीमती मंगला यांनी कपडे, पाटी- पेन्सिल, शाम्पू, बिस्किटे, निरमा, साबण, पुस्तके दिली आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांनी स्कूल बॅग, खाऊ दिला आहे.*
*मा. दिलीप देशमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी पत्नी दीपाली व मुलगा दुर्गेश यांचेसह पालास भेट देऊन स्वेटर, बॅग व खाऊ दिला होता. पती-पत्नी व मुलगा श्रीमती संगीता यांच्या कार्यावर व मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर खूपच खूश झाले होते.*
*मुलांना ३० पर्यंतचे पाढे पाठ आहेत. मुले हिंदी व इंग्रजीत बोलतात. सामान्यज्ञान तयारीही खूप चांगली आहे. पोलीस कॉन्स्टेबल असणाऱ्या श्रीमती संगीता यांनी रोज दोन तास शिकवूनही मुलांची तयारी खूप चांगली केली आहे.*
*श्रीमती संगीता यांनी मुलांचे केस कापण्याचे कामही केले आहे. देशातील पहिल्या शिक्षिका असतील की ज्या मुलां-मुलींचे केसही कापतात. मुलांना रोज आंघोळ करण्यासाठी साबण, शॅम्पू देतात.*
*मुलांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य बघून श्रीमती संगीता खूप भारावून जातात. मुलांची शिकण्याची जिद्द व मोठं व्हायचे स्वप्न बघतात हे पाहून केलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे श्रीमती संगीता सांगतात. स्वत:च्या मुलांप्रमाणे त्या पालातील मुलांची सेवा करतात.*
*पालामध्ये ज्ञानाच्या पणत्या पदरमोड करून व ड्युटी करून मोफत शिक्षण देणाऱ्या श्रीमती संगीता मारूती ढोले यांना साष्टांग नमस्कार. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे श्रीमती संगीता यांना नेहमीच खूप सहकार्य व प्रोत्साहन मिळते.*
*श्रीमती संगीता मारूती ढोले यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना!*
*पोलीस म्हणून कायमच जीवावर उदार होऊन सेवा देताना रोज दोन तास गरीब मुलांसाठी शिक्षण देणे म्हणजे या आधुनिक सावित्रीबाई फुले*
संपत गायकवाड
(सहाय्यक शिक्षण संचालक)
No comments:
Post a Comment