Wednesday, 21 February 2018

सोनू

[2/21, 2:08 PM] चंद्रकांत निकाडे: *सोनूचा खाऊ*
चल चल सोनी
बाजारला जाऊ
वाटीभर पाटीभर
आणायला खाऊ

बाजारला आणि
कोण कोण येणार
आई माझ्या दादाला
सोबत घेणार

लाल लाल टमाटे
करायला भाजी
काकडी आले
कोथंबीर ताजी

अाजोबांना शेव
आजीला पापडी
बाजार भरायला
पिशवी कापडी

बाबांची आठवण
ठेवायला पाहिजे
थोडे चणे शेंगदाणे
आणायला पाहिजे

बैल घोडा हत्ती
छोटा भिम गदा
सगळेच पाहिजे
म्हणतोय दादा

दादाच्या खेळण्याने
पिशवी भरली
सोनीच्या खाऊला
जागा नाही उरली

दादाने डिकीत
खेळणी ठेवली
सोनूची बरणी
पिशवीत मावली.

.    *अनुतनय*

No comments:

Post a Comment