[7/13/2017, 6:48 PM] चंद्रकांत निकाडे: मणी मोडला मानंचा
आभाळाकडं पाहून
वाती विझल्या डोळ्यांच्या
आसू वाहून वाहून
वाटलंतं अौंदातरी
वेळेवर बरसेल
घात साधून पेरणी
पीक जोमात पोसेल
नक्षत्रांच्या सावलीनं
तरवा कोमेजून गेला
वाट बघून कितीदा
गुठ्ठा सपनात केला
एवढासा तरी येरे
थोडी विहीर भरूदे
हात पाय न मोडता
त्याला सुखानं मरूदे
फास टाकाया पुरती
फांदी झाडाची पोसूदे
भार त्याचा सारा त्याला
एकट्यालाच सोसूदे
आता निर्वाणीचा एक
प्रश्न आहे तुझ्यासाठी
'शेतकऱ्याचा मागावा
जन्म कोणी कशासाठी ?'
*रमेश कुरलीकर*
पन्हाळा, कोल्हापूर.
[7/17/2017, 7:27 AM] चंद्रकांत निकाडे: *आजीच्या गोष्टी*
आजी आमची रोज सांगतो
गोष्ट मजेची नवी नवी
दह्यामध्ये घालून पाणी
घुसळत बसते रवी रवी
गोष्टीत एका असतो हत्ती
माणसासारखा बोलणारा
आणि घोडा ठगडगठगडग
वाऱ्यासारखा पळणारा
मोर देखणा मऊ पिसांचा
थुईथुई थुईथुई नाचणारा
अवखळ कुत्रा मोती कधीतरी
आमच्यावरतीही भुंकणारा
गोष्टीत एक परी असते
जादूची छडी देणारी
दृष्ट भलतीच एक चेटकीण
खदाखदा हसणारी
चांदोमामा ढगाआडून
लपाछपी खेळणारा
आणि राक्षस काळाकुट्ट
चिल्यापिल्यांना छळणारा
हसू येते, भीती वाटते
सारे घाबरून जातात
गोष्ट सांग रोज नवी
तरी अाजीला म्हणतात
*अनुतनय*
[7/18/2017, 11:37 PM] चंद्रकांत निकाडे: मीही तुझ्याच गावाचा
नको खेद करू राजा
बहिणाईस साष्टांग
आहे दंडवत माझा
कवी जन्माचा लागतो
मातीतून घातीतून
लख्ख प्रकाश तेव्हाच
देतो अनुभूतीतून
बाकी अळंबी हंगामी
असे नका म्हणू कोणी
ज्याची-त्याची वेळ आहे
मोती अळवावरलं पाणी
ममत्वाने समजावा
बोल गोड अंतरात
वर धपाटा घडाया
आत आधाराला हात
नाही कुणीच जन्मला
सारे शिकून पोटात
थोडे हसू आणि अासू
मन भरल्या ओठात
[7/19/2017, 6:30 PM] चंद्रकांत निकाडे: *जगाचा पोशिंदा*
नको असा अविचार
फिर माघारी रे, राजा
लाख मोलाचा हा जन्म
फुकासाठी नाही तुझा
दावणीला सर्ज्या-राज्या
अन् गोठ्यातली गाय
तुझ्या माघारी अनाथ
सांग करतील काय ?
तुझा हात पाठीवर
फिरताच घडी घडी
मूठभर चारा त्यांना
माया डोंगराएवढी
दोन पोरं हिरा मोती
परदेशी रे होतील
सांग तुझ्या मागे तीही
कोणाकडे पाहतील ?
तुझ्या नावाचं रे कुंकू
लेते भरून कपाळ
तिला सोडून एकटी
नको उजाडूस भाळ
गुन्हेगाराची तू मौत
का रे मागून घेतोस !
साऱ्या जगाचा पोशिंदा
दीन,भिकारी होतोस
नको असा धीर सोडू
लाज त्यालाही वाटेल
बरसेल कधीतरी
पांग जन्माचा फिटेल
*रमेश कुरलीकर*
पोहाळे, पन्हाळा, कोल्हापूर.
[7/22/2017, 9:18 PM] चंद्रकांत निकाडे: डोंगराच्या कड्यावर
आलं आभाळ भरून
करू भाताची लावणी
गुठ्ठा रानाचा करून
कवा येईल पाऊस
अजिबात नेम नाही
पैरेकऱ्यांनो जराशी
अाता हाता करा घाई
घात साधावी अशीही
वेळ आलीया चालून
सारं शिवार नटू दे
हिरवा गजरा माळून
डोंगराच्या पायथ्याला
बांधाबांधावर घाई
सोबतीला आहे सदा
उभी माझी रखुमाई
अशी पेरणी झोकात
पीक फुलारून यावं
घास मिळून वेळेला
गाव आनंदात न्हावं
रमेश कुरलीकर.
[7/23/2017, 4:26 PM] चंद्रकांत निकाडे: *प्रतीक्षा*
कालही तुझ्या नयनात
अश्रू होते
वाट पाहून थकलीस तेव्हा
असं काय करतेस वेडे!
दिलं ते दु:ख तरी
थोडं आहे का?
म्हणून निदान
गळा तरी
मोकळा केलास
समज तुझा माझा
नव्हता ऋणानुबंध
पण लक्षात ठेव
पुढच्या जन्मी मुकी होऊ नकोस
एक थांबा अगोदरच
साद घाल
ओळखणं सोपंच आहे
या आत्म्याचा कण नि कण
तेव्हा सुद्धा
तुझेच गीत गात असेल.
रमेश कुरलीकर
[7/23/2017, 5:14 PM] चंद्रकांत निकाडे: तो फुले पाठवत होता
अनोळखी समजून
तिने ती नाकारत होती
तो फुले पाठवतच राहिला
कंटाळून तिने दारच बंद केले
त्याच्यासाठी
तरीही
तो पाठवतच राहिला
अविरत,नित्यनेम
काही दिवसांनी तिच्या दारात
फुलांखाली कचऱ्याचा ढीग
लोक म्हणत
वेडीला कळत नसेल का ?
आजची फुले उद्यासाठी कचराच असतात
फुलांचा अपमान सहन न होऊन त्याने आत्महत्या केली
'अंत्ययात्रेत कोणीही फुले वाहू नयेत' अशा मजकुराची चिठ्ठी लिहून
ती
तो ढीग उचलून घेऊन
स्मशानात गेली
उधळण्यासाठी
वाऱ्याबरोबर
काही पडली
शेजारच्या चितेवर
त्याबरोबर
तिने ऎकला अावाज
थँक्यू
आजकाल
ती म्हणे वेड्यांच्या इस्पितळात मुक्काम ठोकून आहे.
[7/23/2017, 5:30 PM] चंद्रकांत निकाडे: *आठवणी*
मधाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर
जशा उधळतात माशा
तशा आठवणी
रुतलेल्या काट्यासारख्या
कचणाऱ्या, सलणाऱ्या
भळभळून वाहणाऱ्या
ठसठसणाऱ्या, बोचणाऱ्या
काही
गोड, हळव्या, कळीसारख्या
अलगद उमलणाऱ्या
तुझी मात्र
या साऱ्या पलीकडे
त्याच पोळ्यातून
ठिबकणाऱ्या मधासारख्या
*रमेश कुरलीकर*
[7/24/2017, 5:06 PM] चंद्रकांत निकाडे: *अनाहूत*
मी उद्गारलो
'तुमचं बाळ !
(खूपच छान आहे.)
... ... ...
फक्त त्याच्या सदऱ्याच्या खाली-वर झालेल्या गुंड्या सरळ करा.'
ते टरकलेच
माझा नंबर काढून टाकला यादीतून.
तरी
माझी आपली
सवय काही सुटत नाही.
(कदाचित वाढत्या वयाचाही दोष असेल.)
खरंच आहे
मागितल्याशिवाय फुकटचा सल्ला कधी, कोणाला देऊ नये.
हा मात्र
हल्ली मी तोच सल्ला
हळूच कानात सांगतो
ज्याच्या-त्याच्या.
त्यांचंही
बरोबरच आहे म्हणा.
'दूध भाजल्यावर
ताकही फुंकूनच प्यावं.'
असाही सल्ला कुणीतरी-कधीतरी
दिला असेल त्यांना.
अनाहूत असेल
पण
एखाद्याचं बाळ आलं
भेटायला तर
एवढीही कृतज्ञता
मी दाखवूच नये का ?
रमेश कुरलीकर.
[7/26/2017, 10:38 PM] चंद्रकांत निकाडे: . *बहरला पारिजात*
आज पहाटे दवांत
बहरला पारिजात
सडा सुगंधी फुलांचा
पसरला अंगणात
तिने नाजूक हाताने
रोपे लावियली दारी
वाऱ्यावर ती डोलता
गेली आनंदून स्वारी
पारिजात माहेरात
कन्या लावूनिया गेली
फुले सांगतात का हो
आता तिचीच खुशाली ?
खूप आवडले कोणा
नेले त्यातलेच एक
तेव्हा रडली हळवी
आमची लाडावली लेक
ज्याने नेले एक रोप
आम्हा सर्वांच्या माघारी
सडा असाच पडला
असेल का त्याच्या दारी ?
*रमेश कुरलीकर*
[7/27/2017, 10:55 AM] चंद्रकांत निकाडे: काही लोक
एखादी कविता
तिच्या बापाचे श्राद्ध घालून
फिरवतात दारोदार
तोवर ठीक
पण अशी
नाव खोडलेली कविता
फिरत फिरत येते
बापाकडेच अजाणतेपणे
तेव्हा खूप वाईट वाटतं
पण तिला
बाप भेटल्याचा आनंद
नक्कीच होत असेल.
[7/28/2017, 3:23 PM] चंद्रकांत निकाडे: . *महा(भाग)कवी*
काही महा(भाग)कवी
एखादी कविता
तिच्या बापाचे श्राद्ध घालून
फिरवतात दारोदारी/घरोघरी
बेवारस अवस्थेत
तरीही ठीक.
पण
कधीतरी अशी
नाव खोडलेली कविता
फिरत फिरत येते
बापाकडेच अजाणतेपणे
तेव्हा खूप वाईट वाटतं
क्षणभर
मात्र लगेचच
आपली कविता लोकांना आवडते
या विचाराने मन हुरळून जाते
हो!
पण मला एक प्रश्न पडतो
तिला बाप भेटल्याचा आनंद
होत असेल का ?
. *रमेश कुरलीकर.*
[7/29/2017, 10:20 PM] चंद्रकांत निकाडे: . *श्रावणसखा*
रिमझिम बरसणारा
श्रावण जीवाचा सखा
सकल जीवांसाठी
हिरवा पाठीराखा
सप्तरंगी इंद्रधनु
श्रावण स्वप्न सृष्टीचे
नितळ निरागस
सुख दृष्टीचे
उ:शाप वसंताचा
श्रावण बहर मनाचा
गुंतलल्या भावाचा
कर्दळी बनाचा
राजबिंडा भारदस्त
श्रावण महिन्यांचा राजा
हृदयांतरीचे गूज
कर्णमधुर गाजा
सणांचा सुकाळ
श्रावण संगीताचा खजाना
हृदयांतरीचे गूज
धरित्रीला नजराणा
नववधुचा शृंगार
श्रावण हळवा चित्तचोर
लाजत मुरडत हसा
नाचरा मनमोर
*रमेश कुरलीकर*
nikade64@gmail.com
[8/1/2017, 8:32 AM] चंद्रकांत निकाडे: *जीवनगाणे*
बिगी बिगी चाल सये
दिस माथ्यावर आला
तान्हुल्याची आटवण
जीव टांगणी लागला
पोटासाठी राबायाला
करू शेतात चाकरी
लाज कशाची धरावी
मिळो कष्टाची भाकरी
उन्हातानात राबून
सेवा धरित्रीची करू
भांगलणी कोळपणी
नको कुठे मागे सरू
घाम गाळून शेतात
चला पिकवाया सोनं
ठेवू इमान मातीशी
गाऊ आनंदानं गाणं
चोच दिली दिले हात
आणि काय मागू नको
दिले सुख भोगायचे
दु:ख कोणा सांगू नको
नशिबात लिवलेले
घ्यावे सुखे समाधाने
अाणि राबावे खुशाल
रोज नव्या आनंदाने
जन्म उजळाया कधी
भीक मागणार नाही
लाख संकटे येतील
मागे हटणार नाही
*रमेश*
[8/3/2017, 7:48 PM] चंद्रकांत निकाडे: *तुझ्या वेणीत माळलेली*
तशी तिला आवडतात
टवटवीत रानफुलं
म्हणून शहरात
फिरायला गेल्यावर
भर दुपारी बाजारात
अनोळखी रस्त्यावर
मी माळले फूल गुलाबाचे
तिच्या केसात
अाणि ती हसली
घरी आल्यावर
आरशात बघून
तेव्हा त्याची एक एक
पाकळी सुटत होती
[8/4/2017, 12:43 PM] चंद्रकांत निकाडे: आल्या चांदण्या वस्तीला
काल स्वर्ग होता दारी
गंधातून पाझरली
माझी जुनी स्वप्ने सारी
सये तुझे डोळे कोठे
होते सांग ना कानात
आणि अजून अबोला
का गे राखून मनात
बघ किती हा शृंगार
जिणे फक्त अर्धा दिस
अन् तू ही मुकी राधा
जीला वावडा पाऊस !
*रमेश कुरलीकर*
[8/6/2017, 9:28 AM] चंद्रकांत निकाडे: *मैत्री*
एकदा स्वीकारलं की
कायम टिकवलं जातं
हवा बहर सदोदित
मैत्रीचं असं घट्ट नातं
ऋतू येतील जातील
जरी बदलले रंग
जपून हिरवळ आत
लढू मिळून जंग
समजून एकमेका
सूर ताल जुळावा
ढंग मैत्रीचा सदा
गडद होत जावा
त्यांच्या विचारावर
ठेवावा विश्वास नित्य
हेच बंधन हीच आस
हेच अंतिम सत्य
तेच धन्य विश्वात
कळले ज्यांना सूत्र
साधा काॅल आठवण
एसेमेस वा असो पत्र
[8/6/2017, 10:00 AM] चंद्रकांत निकाडे: *मनीषा*
भिंत बांधताना गवंड्याने
रचावी एक एक वीट
एकमेकीवर आणि
मध्ये सिमेंट घट्ट राहण्यासाठी
तशी जोडावी माणसं
पेरत मैत्रीचं नातं
घट्ट व्हावेत बंध म्हणून
एक एक विचार
विश्वासाने पेरत जावे आणि
स्वीकारावे गुणदोषांसह
तेव्हाच गळून पडतील
मी-माझेपणाचे तकलादू पंख
अोझे आयुष्याचे उचलावे
कुणीतरी, कधीतरी
नसतेच अपेक्षा
फक्त आधाराचा हात मात्र हवा
मित्रांनो!
त्याशिवाय पुढील प्रवासास
जाणेच अशक्य
ही एवढी एकच मनीषा
अाज,उद्या आणि
परवाही
*रमेश कुरलीकर*
[8/7/2017, 7:08 AM] चंद्रकांत निकाडे: *तुझा होकार*
मन मोकळं करून
आज घेतला गं श्वास
माझ्या स्वप्नांचा आकांत
आणि संपला गं भास
फुलासारख्या कोमल
आठवणी ज्या कुपीत
नभ साक्षीला ठेवून
कसे जपले गुपीत !
मनातले अोठावर
येता काळीज हलले
तुझ्या अत्तरशब्दांना
तळहाती मी झेलले
भावनांचा गुच्छ असा
फुलारल्या वेलीवर
पडे नाजूक मोहक
एक खळी गालावर
तुझ्या याच होकाराची
आजवर होती आस
आणि संपली प्रतीक्षा
गंधाळला मंद श्वास
*रमेश कुरलीकर*
[12/12/2017, 11:43 AM] चंद्रकांत निकाडे: . *पाने इतिहासाची*
बेलाग तुझ्या स्वप्नांना
डोळ्यांतच साठवले मी
पानांना इतिहासाच्या
नि मनात गोठवले मी
क्षण अमोल सहवासाचे
परतून कधी येतील का
प्रत्येक तुझ्या श्वासाला
पुन:पुन्हा आठवले मी
विरहाची मोहर हसली
तेव्हाच लगबगलगबग
संदेश मुक्या वाटेने
तुज मुकाट पाठवले मी
मौनात सोंग झुरणारे
मरणाच्या पडद्यामागे
एकांती कुढता आत्मा
कैकदा निवठवले मी
त्या तुझ्या सावल्या काही
मज निरखून पाहात होत्या
तेव्हाही अगतिकतेने
दरवाजे ठोठवले मी
ठिगळांचे वस्त्र जुनेरी
उकसावीत बसलो केव्हा
उसवलेत चाँद बिलोरी
सगळ्यांना गाठवले मी
. 🌙🌞
[2/8, 9:58 AM] चंद्रकांत निकाडे: कधी जळतात माणसे
तशी कळतात माणसे
ऊरी भलत्याच संशये
उगी घळतात माणसे
मुकी असतात अंतरी
मला छळतात माणसे
पुरी जगतात कोडगी
कणी दळतात माणसे
तशी धरसोड सारखी
खुळी पळतात माणसे
मनी नुसताच कालवा
भली वळतात माणसे
. *रमेश*
No comments:
Post a Comment