[9/21/2017, 4:14 PM] चंद्रकांत निकाडे: *का?*
काहीजण मला विचारतात,
*"या मुद्रितशोधनातून. लष्कराच्या भाकरी का भाजतोस?"*
'एवढ्या वेळात
एखादी कविता किंवा
कथा लिहून पूर्ण करशील!'
माझे ठरलेले उत्तर
*"कथा, कविता तर.
मी लिहिणारच आहे.
त्या अजूनही
माझ्या मनात आहेत.
शाबूत !"
पण हे जन्माला/प्रकाशात आलेलं/येणार आपल्याच मित्रांचं
गोंडस बाळ
लोकांना विद्रुप दिसू नये
ही काळजी
आधी घ्यावीसे वाटते.
तीही मातृभाषेचीच सेवा
नाही का! "*
. *रमेश कुरलीकर*
[10/1/2017, 9:24 AM] चंद्रकांत निकाडे: . *अनामिक शाप*
कोणती शोधू दिशा माझे मला कळेना
घातले घाव ज्यांनी नाव त्यांचे कळेना
कैकदा मेले तरी मयरावण हट्टी जाळता व्याधीग्रस्त त्यांचे मढे जळेना
विसंगत मैफली दुरावे ताल लय असुरी रंगरात्री सूर माझा जुळेना
विश्वकर्ता नाटकी आभाशी जगदात्मा
समजतो आळशी तो मला जो छळेना
माझ्या ललाटी सांज नाहीच का रे विध्या ? टळटळीत उन कालसूर्य ढळेना
माघार घ्यावी लागे जीत हाती असता
शापीत कृद्ध झाली वेळही ती टळेना
रक्त सारे गोठले पाहता नीच कावे
जाहले षंढ कर्ते चाँद सळसळेना
. *रमेश कुरलीकर*
[12/12/2017, 11:43 AM] चंद्रकांत निकाडे: . *पाने इतिहासाची*
बेलाग तुझ्या स्वप्नांना
डोळ्यांतच साठवले मी
पानांना इतिहासाच्या
नि मनात गोठवले मी
क्षण अमोल सहवासाचे
परतून कधी येतील का
प्रत्येक तुझ्या श्वासाला
पुन:पुन्हा आठवले मी
विरहाची मोहर हसली
तेव्हाच लगबगलगबग
संदेश मुक्या वाटेने
तुज मुकाट पाठवले मी
मौनात सोंग झुरणारे
मरणाच्या पडद्यामागे
एकांती कुढता आत्मा
कैकदा निवठवले मी
त्या तुझ्या सावल्या काही
मज निरखून पाहात होत्या
तेव्हाही अगतिकतेने
दरवाजे ठोठवले मी
ठिगळांचे वस्त्र जुनेरी
उकसावीत बसलो केव्हा
उसवलेत चाँद बिलोरी
सगळ्यांना गाठवले मी
. 🌙🌞
[12/17/2017, 8:14 PM] चंद्रकांत निकाडे: . *माणसे*
धुंडला बाजार तरीही
ना मिळाली माणसे
मागता आधार सगळी
ही पळाली माणसे
गात होते देशभक्ती
ताणूनी बेंबीस आपल्या
स्वार्थ जेव्हा आठवला
ती गळाली माणसे
जात कधी तर पंथही
अडला निशाणे देखता
बेगडी अातून फुसकी
जी जळाली माणसे
काल ज्यांनी घात केला
रंग त्या किडक्या मनांचा
शोधता अंतर्मनातून
मज कळाली माणसे
मुखवट्याचे रंग त्यांच्या
जाहले पाहून फिके
जाणले तेव्हाच होते
का ढळाली माणसे
पाय चुळबुळत होते
दूर जाण्या सारखे
साधता संधी जराशी
धूम वळाली माणसे
भरवशावर ठाम होतो
ते निपजले टोणगे
संगती राहून काही
मज गिळाली माणसे
. 🌙🌞
[1/27, 2:08 AM] चंद्रकांत निकाडे: . *माणसे*
कैक दिवसांच्या प्रयत्ने ही मिळाली माणसे
की नशिब माझे फळाले ही मिळाली माणसे
होतो दुरावा क्षण एक केव्हा
एवढ्याशा कारणे
म्हणून का ती दूर लोटू ही मिळाली माणसे
काय सांगावे उद्या हे जग सारे
सोबती पण
हट्ट पुरवायास नसतील ही मिळाली माणसे
भांडण्या-रुसाण्या हवे मज
एक नाते मैत्रीचे
आणि हक्काने लढाया ही मिळाली माणसे
जर नसे हसण्यास खुदकन समजुतीने एवढ्या
शोध कोठे घ्यावयाचा हो ही हरवता माणसे
आस ना त्या वाळवंटाची विरानी
वांछिली
हीत यातच मी जपावी ही मिळाली माणसे
दवडतो का स्वर्गसुख हे बहुत प्रयासे मिळाले
चाँद तुझिया सोबतीला ही मिळाली माणसे
. *चाँद परछाई*
No comments:
Post a Comment