. *नाते*
कुणी लिहावी कविता
कुणी वाचावी कविता
गंध भारल्या मनाने
कुणी ऐकावी कविता
अभिप्राय कधीतरी
द्यावा जनमानसात
आणि असेल तरीही
न्यून सांगावे कानात
अशी हृदयात राहे
गूज अंतरीचे सांगे
जन्मोजन्मीचा दुरावा
दोन पावलात लांघे
किती माणसे जोडली
तिने मजसाठी गुणी
कधी सहजच घाली
हात काळजाला कुणी
कवी आनंदाचे झाड
कवी शाश्वताचे वेड
सावराया आधाराची
कवी झोपडीची मेढ
. *रमेश*
No comments:
Post a Comment