. *आयुष्य असे*
विस्तीर्ण जलाशय सोबत हिरवाईची
अन झाड जुनेसे काठावर वठलेले
वार्धक्य जाणवे त्याच्या अवतारात
निष्पर्ण तरीही प्रेमाने झुकलेले
आसरा घेऊनी त्याच्या देहावरती
हे चौदा पक्षी भ्रमंतून थकलेले
की असतील सांगत बसून फांदीवरती
गूढ आयुष्याचे नव्या पिढीला आपले
वा संधीसाधू बगळे शोधिती भक्ष
लावून ध्यान खोटेच बघा टपलेले
मानवी मनाचे तरंग जणू ती निळाई
जीवन असावे आपलेही सरलेले
. *रमेश कुरलीकर*
No comments:
Post a Comment