🙏🙏🙏🙏🙏🙏
साहित्य पुरवणीसाठी
विडंबन काव्य
(ता.क.निवड करावीसे वाटल्यास
गोपनियता ठेवावी.)
*कशास डंका*
चिमणे जीवन
चिमणे गाणे
किती चिल्लर
आपले नाणे
संगर त्याचा
लढणे हाती
किती जिंकले
*हरले* किती
खडतर वाटा
मोह भोवती
चाक रूतते
पळते गती
*क्षणभंगुर*
सारा पसारा
कशास डंका
पोकळ वारा
कळे नियती
ज्याची तयाला
फिरते चक्र
नेते लयाला
प्रा....साईनाथ पाचारणे
भोर पुणे
🙏🙏🙏🙏🙏🙏
मा.प्रा.साईनाथ पाचारणे
यांची क्षमा मागून
🙏🙏🙏🙏🙏🙏
*कशास पंखा*
आपले जीवन
लाजिरवाणे
किती उकाडा
भिजू घामाने
तोरा त्याचा
कुढणे हाती
किती भिजावे
दिवस नि राती
खडतर वाटा
झळा भोवती
नाक कोरडे
जळते छाती
क्षणभंगुर त्या
पाऊस धारा
कशास पंखा
उष्णही वारा
कळे उन्हाळा
ज्याचा त्याला
चक्र ऋतूंचे
म्हणती याला
. *रमेश कुरलीकर*
9172994564
No comments:
Post a Comment