Friday, 18 May 2018

Manachya gavala

.    *मामाच्या गावाला*
. (गदिमांची क्षमा मागून)

पमपम पमपम मोटारगाडी
तोडून टाकली हिरवी झाडी
भकास डोंगर पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया मामाच्या गावाला जाऊया   ॥धृ॥

मामाचा बंगला आरसीसी
पिओपी भिंती छान फरशी
उकडता उघडे लोळुया
मामाच्या ...  ॥१॥

मामाची बायको सावळी
म्हणेल कुठली बावळी
आधार कार्डे दाऊया
मामाच्या ...   ॥२॥

मामाची बायको शिकलेली
नोकरी करून थकलेली
पिझ्झा बर्गर खाऊया
मामाच्या ...   ॥३॥

मामा आमचा कामात
शिलाईचे भाव जोमात
जिन आणि टी शर्ट लेऊया
मामाच्या ...   ॥४॥

मामाची बायको धाकटी
वेगळी राहाते एकटी
आजी आजोबा शोधूया
मामाच्या ...   ॥५॥

.               *अनुतनय*

No comments:

Post a Comment