*नाही काही मागायाचे*
किती मागाव्यात दुवा
किती जपावा ओलावा
काळजात ज्यांच्या घर
दंडवत त्यां घालावा
खोलखोल अंधारात
जेव्हा होतो रूतलेला
श्वास प्रत्येक आठवे
त्यांच्या कडून घेतला
आणि आयुष्याचे वस्त्र
जिथे जेव्हा फाटलेले
गेले शिवून सहज
मित्र सर्व भेटलेले
सदा राहूदे माझाच
असा याचकाचा हात
त्यांना येऊदे ऐश्वर्य
चेतवीन मैत्रवात
नाही काही मागायाचे
अन्य मजसाठी आता
फक्त याद त्यांची राहो
श्वास नित्य येता जाता
अशी जोडीन हृदये
लाजतील चंद्र तारे.
सुदामाचे दे आयुष्य
कृष्ण भेटतील सारे
. *रमेश*
No comments:
Post a Comment