Wednesday, 21 March 2018

चौदाखडी

बाराखडी आता झाली जुनी
नवी अंकलिपी घ्या पारखुनी
*अॅ*आणि *आॅ* हे नवीन स्वर
भरतात तेरा आणि चौदावे घर
बाकी सारे जुनेच तरी
ओळख असेल नवी
प्रत्येकाने करून घ्यावी
आपणास जशी हवी.

*अ*- अक्षरचा *आ*-आईचा
*इ*-इमारतचा. *ई*- ईमेलचा‌
*उ*-उखळाचा, *ऊ*- ऊसाचा
*ए-* एकचा,  *ऐ*- ऐकण्याचा
*अॅ*- अॅटमचा, *ओ*- ओझ्याचा
*औ*- औषधाचा, *आॅ* आॅगस्टचा,
*अं*- अंगठ्याचा *अ:*- स्वत:चा
अ आ इ ई उ ऊ ए ऐ अॅ ओ औ अं अ:

No comments:

Post a Comment