थांबला पाऊस तिजला पाहता
मेघही जागीच थिजला पाहता
केवढा विश्वास पाऊस यावया
बांधही नाहीच भिजला पाहता
जाणता आकांत शिणला बापही
रोडक्या बैलास खिजला पाहता
पारवा रानात घुमला कैकदा
आपली मैत्रिण लाजला पाहता
गिरणी थकून थांबले कामही
चूल ना पेटली विझला पाहता
लाजरी डोळ्यांस भिडता चांदणी
चंद्रही घायाळ निजला पाहता
No comments:
Post a Comment