Friday, 18 May 2018

Patlin

*घटस्फोटानंतरचे प्रेम*

१९९६ मध्ये योगायोगाने *फाॅरेनच्या पाटलीणच्या* प्रेमात पडलो. बँक आॅफ इंडियातील सर्व्हिस सोडून ती मोहिते काकांच्या सहकार समुहात रूजू झाली होती. मोहिते काकांना तिचा सख्या मुलीइतका लळा लागला होता. तिची हौसमौज, दागदागिने, कपडालत्ता तिला जसं हवं तसं थेट इंग्लंडहून मागवत असत. या बाबतीत कसलीही तडजोड करत नसत.तीही त्यांचं मन जिंकून होती. *(हे डाॅक्टर फिरोजनी मला सांगितलं होतं बरं का! )* 
तशी ती जन्मानं, वंशानं, वळणानं आणि रुपानंही इंग्लंडचीच. एकदा सहज शनिवारी आमचे मित्र डाॅ.फिरोज यांचेकडे गप्पा मारत बसलो असताना *फाॅरेनच्या पाटलीणची* पहिली भेट झाली. अगदी किरकोळ घशाची तक्रार होती. पण मोहितेकाकांनी ताबडतोब डाॅक्टरांकडे पाठवलं होतं. बहुत्तेक फाॅरीनर्स डाॅक्टर फिरोज यांचेकडेच हाॅस्पिटलमध्ये उपचाराला येत त्याचं कारण म्हणजे. डाॅक्टर फिरोज आणि त्यांचे वडीलही अशा फाॅरीनर पेशंटच्या तक्रारीच्या न सांगताही केवळ बाह्य लक्षणावरून समजत असत. पेशंट दारात आल्याबरोबर ते ओळखत. किरकोळ गोळ्या, इंजेक्शन किंवा मालीशनंही पेशंटची दुखणी चुटकीसरशी पळत. मोहितेकाकांचे फॅमिली डाॅक्टर फिरोज होते हा दुसरा योगायोग. या पाटलीणीचं व्यक्तिमत्त्व अतिशय रूबाबदार होतं. अगदी बघताक्षणी कुणीही प्रेमात पडावं असंच. आणि आम्ही तेव्हा वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम नव्हता स्वीकारला.
माझ्या मनाची उलघाल बघून डाॅक्टर हळूच म्हणाले, "यंदा कर्तव्य आहे असे मोहितेकाका म्हणत होते. मागणी घालायची का? "
मी ओशाळलोच. डाॅक्टर चेष्टा करताहेत असं वाटलं. होकार-नकार काहीही न देता मी गुपचूप तिथून निसटलो. पण फाॅरेनच्या पाटलीण बाईंनी मात्र मनात घर केलं होतं.
मध्ये काही दिवस गेले. एक दिवस सायंकाळी महाद्वारवर मित्रांबरोबर सहज फेरफटका मारताना मोहितेकाका भेटले, अर्थात ती सोबत होतीच.
आम्हाला बघून काका थांबलेच. मित्रांशी काही बोलत होते. मी मात्र एकसारखा तिच्याकडेच चोरट्या नजरेनं पाहात होतो. ही गोष्ट काकांच्या लक्षात आली. काकांनी थेट घरी बोलणी करण्यासाठीच बोलावलं. म्हणाले, *"तुझ्यासारख्या उमद्या,तगड्या जबरदस्त तरूणाचा आणि हिचा जोडा किती शोभून दिसेल."*नाही म्हणवत न्हवतंच. आम्हीही शनिवारी येण्याचं कबूल केलं.  नाहीतरी त्यावेळी तिचं वय बावीस होतं. तिचा जन्म जानेवारी १९७५ चा (हे जन्मपत्रिका बघितल्यावर मला समजलं, केवळ नजरेनं एखाद्याचं वय ओळखण्याची अक्कल मला तेव्हा नव्हती. *आणि आताही नाही.)*
आम्ही ठरल्याप्रमाणे शनिवारी गेलो. बोलणी झाली. मोहितेकाकांनी स्वहस्ते,स्वखर्चाने कन्यादान केले आणि सायंकाळी आमची वरात गावी आली. घरच्यांसह, मित्र, शेजारी, ग्रामस्थ सर्वांना खूप आनंद तर झालाच पण आश्चर्याचा धक्काही बसला. गावात सून म्हणून आलेली ती पहिलीच फाॅरेनची पाटलीण होती.
उणीपुरी दहा बारा वर्षे आमचा संसार अगदी व्यवस्थित झाला. मध्यंतरी काहीतरी बिनसलं न सांगण्यासारखं. अगदी प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं. पण तो घेतला नाही. मध्यस्तीनं आणि तडजोडीनं आम्ही विभक्त राहण्याचा निर्णय मात्र घेतला.
त्यानंतर आठ/दहा वर्षे अशीच गेली.
परवा आमचे दादासाहेब (थोरले चिरंजीव)अचानक म्हणाले,"पप्पा, आज फाॅरेनच्या पाटलीणबाईंना घेऊन घरी येतोय." त्यांच्या या अचानक जाहीर केलेल्या पवित्र्याने थोडा दचकलोच पण क्षणभरात स्वत:ला सावरलं. थोडी हुरहुर लागली.आणि सायंकाळी अचानक अगदी त्याच पारंपरिक पेहरावात. सोबत काही आधुनिक अलंकार होते. रूप तेच लोभसवाणं, आकर्षक, कमनीय, अलंकृत, पाटलीणबाई हजर

No comments:

Post a Comment