Monday, 28 May 2018

नवी कविता

*नवीकोरी कविता माझी*
सकाळी उठलो
जरासा लौकर
सगळीच कामे
केली भरभर

सफाई करता
थोडी कळ सोस्ली
अंघोळीच्या वेळी
दातेही घासली

नाश्ताही खाल्ला
वर प्यालो पाणी
कामास जाताना
गुणगुणली गाणी

अाॅफिस कामात
वेळ असा गेला
दुपारचा डबा
रिकामा केला

संध्याकाळी आलो
सरळ घरात
गाडीला लावली
आपल्या दारात

टमटमीत खाल्लं
रातचं जेवण
आमटी चपाती
भाजीही ए वन

मोबाईल घेत
आताच बसलो
अशीही झक्कास
कविता लिवलो.

No comments:

Post a Comment