. *मर्यादा*
अर्धे कच्चे खाऊन बाळा
उठेल शूळ दुखेल पोट
उघड्या अंगी नको,घाल
सुंदर सदऱ्यावरती कोट
सगळीकडे गाणे गाता
राजासारखी होईल गत
राजवाडा जळून जाईल
कळेपर्यंत आपले मत
अति तेथे माती असते
जेवढ्यास तेवढे पुरे
शब्द वाणी तोलून लिहा
नसते सर्व आपलेच खरे
जळून गेल्यावरती चंदन
राख उरते नुसती हाती
गंध रूप कुठले त्याला
किंमत त्याची होते माती
बोल आपला सदा असावा
बिनलाखेचे अस्सल सोने
प्रकृतीला जपा, नसावे
अजीर्ण होईल इतके खाणे
सूर्यालाही कळते म्हणून
रात्री तोही घेतो रजा
मर्यादेतच राहावे सदा
तरच असते खरी मजा
. *चंदन*
No comments:
Post a Comment