Monday, 28 May 2018

पुस्तके

📓📔📒📕📗📘📙📚📖
.      *ग्रंथ*

ग्रंथ आपले जीवन
ग्रंथ ज्ञानाचे साधन
हेची आम्हा घरी धन
सर्वकाळ

सुख दु:खातील साथी
दूर अज्ञानाच्या राती
ग्रंथानेच जुळली नाती
आजन्माची

लाभो शांती समाधान
फुलो जीवनी चैतन्य
नसे आस काही अन्य
ग्रंथापासी

घडो त्यांचा सहवास
जडो प्रीती लागो ध्यास
दरवळो श्वास श्वास
आपुलाही

.          *रमेश कुरलीकर*
📖📚📙📘📗📕📒📔📓

No comments:

Post a Comment