Sunday, 3 June 2018

गृहपाठ आणि कुडतं:प्रकाशन

.             *पोहाळे तर्फ आळते* येथील श्री नवनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत. निकाडे यांच्या *गृहपाठ* व *कुडतं* या कथासंग्रहांचे प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवन,दसरा चौक, कोल्हापूर येथे  नुकतेच संपन्न झाले.
.       मुलांनी पुस्तके पाहावीत, निवडावीत व खरेदी करून वाचावीत या चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या उद्देशानुसार अल्पमूल्य योजनेतून कॅडबरी बुक माला अंतर्गत या दोन्ही कथासंग्रहात प्रत्येकी पाच पाच कथा आहेत.
.       या भावस्पर्शी, संस्कारक्षम कथांची निवड जेष्ठ साहित्यिक व आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी गोविंद  गोडबोले यांनी केली आहे.
.     चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या वतीने झालेल्या या प्रकाशन समारंभात प्रा.विनोद कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.यावेळी बोलताना चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मुख्य संयोजक मिलिंद यादव यांनी *पुस्तके केवळ प्रदर्शनीय वस्तू नसून ती खरेदी करून वाचायची असतात, ही भावना मुलांच्या मनात रुजविण्यासाठी हृदय प्रकाशनचे हे कॅडबरी बुक उपक्रमातील कथासंग्रह संस्थेचा उद्देश सफल करतील.* असे सांगितले.
प्रा. कांबळे यांनी *विद्यार्थ्यांचे भावविश्व समृद्ध करणाऱ्या गृहपाठ व कुडतं या कथासंग्रहांनी मराठी बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे. मुलांची मने संस्कारित होण्यात चंद्रकांत निकाडे यांच्या कथाकथनाइतकेच कार्य ही पुस्तके करतील* असा विश्वास व्यक्त केला.
चंद्रकांत निकाडे यांच्या कथा, काव्य, कादंबरी, नाट्यछटा, एकांकिका
, व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध प्रकारच्या तीस पुस्तकांचे प्रकाशन यापूर्वी झालेले असून विविध बालसाहित्य संमेलने व स्नेहसंमेलनातून कथाकथनाच्या माध्यमातून या संस्कारक्षम कथा मुलांपर्यंत पोहचवल्या आहेत.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. समिक्षा फराकटे यांनी केले.आभार संयोजक अनिल काजवे यांनी मानले.

No comments:

Post a Comment