Wednesday, 27 June 2018

कालच्या पावसाने


       कालच्या पावसात

कालच्या पावसात ढासळलेली
मागची भिंत रचायला
दगड उचलताना
बापाच्या हाताला
उठलेले फोड
आई गरम भाताच्या
पातेल्यावर शेकत होती

बापाच्या हाताचे फोड जिरतील तसा
आईचा चेहरा उजळत होता.

बापाच्याआधी
माझे डोळे पाणावले.
मी पुढे जाऊन
दोघांचे पाय चेपायला सुरवात केली.

आई म्हणाली,"बाळा, तुझा तू अभ्यास कर. जा."
 
बाप नुसताच माझ्याकडं बघत होता.
भरल्या डोळ्यांनी
नव्या स्वप्नात जगत होता

.        रमेश कुरलीकर

No comments:

Post a Comment