*संततधार...*
संततधार पाऊस पडतो
तेव्हा तिची आठवण येते
पुन्हा एकदा माझ्यासाठी
भळभळणाऱ्या जखमा देते
ओल्या ताज्या त्या जखमांना
तरीही एक सुगंध असतो
हळवे मन तिचे त्यावरी
नाजूक फुंकर घालून जाते
मजबूर तीही असेल समजून
मी थोडासा खजील होतो
घर तिचे ओलांडून जाता
फुलपाखरू मनी भिरभिरते
रस्त्यावरच्या डबक्यामध्ये
पुन्हा सोडतो मी पण नावा
आणि पुढच्या जन्मासाठी
सुरू राहतो तिचाच धावा
. *रमेश*
No comments:
Post a Comment