Saturday, 30 June 2018

पाऊस

*पाऊस*

प्रेम पाऊस
क्षेम पाऊस
मनामनांत
सेम पाऊस

ताज पाऊस
साज पाऊस
समिंदराची
गाज पाऊस

गर्द पाऊस
सर्द पाऊस
श्रावण सर
मर्द पाऊस

मान पाऊस
छान पाऊस
शेतकऱ्याचा
प्राण पाऊस

तुझा पाऊस
माझा पाऊस
निसर्गातील
राजा पाऊस

.       *रमेश*

No comments:

Post a Comment