Thursday, 6 September 2018

तुकोबाचे भेटी

|| तुकोबाच्या भेटी शेक्स्पेर आला ||

तुक्याच्या भेटीला|
शेक्सपेर आला|
तो सोहळा झाला |
साय्बरात ||

झाली दोघांचीच |
नेटवर भेट|
पुस्तकात्ले थेट|
पेन्ड्राय्वात ||

तुक्या म्हणे "विल्या,|
तुझे काम थोर |
अवघाची संसार |
रिता केला" ||

शेक्स्पीअर म्हणे, |
"तेवढं राह्यलं।
तुवा जे पाह्यलं |
भिमेकाठी"||

तुक्या म्हणे, "लेका |
त्वा बरं केलंस |
तडीला न्हेलंस |
साहित्याला ||

इठ्ठल अट्टल |
त्याची रीत येग्ळी |
पाटी कोरी सग्ळी |
माझी की गा"||

शेक्स्पीअर म्हणे,|
"तुझ्या गाथेमुळे ।
भगवंत कळे |
अडाण्याही"||

तुक्या म्हणे, "गड्या |
उगाच ढिंढोरा |
भाषेचा डोलारा |
येगळाच ||

येगळ्याच वाटे|
येगळाच गाव |
भेटे भक्तीभाव |
तोच पुन्हा ||

ऐक रिंगटोन |
मोबाईल मध्ली |
गाठू आपापली |
गावशीव"||

दोघे धावोनिया |
गेले दोन मार्गे ।
टीव्हीच्या कव्र्हेजा |
गवसेना ||

- *रमेश कुरलीकर*

No comments:

Post a Comment