आणखी एक उदाहरण!
किती गोजिरे व्हायचे, कोण जाणे
कशाला तुझे व्हायचे, कोण जाणे
तिला मी नकोसा, मलाही नकोसा
कसे आमचे व्हायचे कोण जाणे
यात ’व्हायचे कोण जाणे’ ही रदीफ़ झाली. त्या आधीचे शब्द आहेत गोजिरे, तुझे, आमचे! यातील समान भाग आहे फ़क्त प्रत्येक शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा स्वर! त्यामुळे ’ए’ हा स्वर या गज़लेचा काफ़िया झाला.
स्वरकाफ़ियाच्या वापरामुळे विचार जरा जास्त मुक्तपणे व्यक्त व्हायला मदत होऊ शकते.
रदीफ़ व काफ़िया -
१. रदीफ़ म्हणजे मतल्याच्या दोन्ही ओळींच्या शेवटी व पुढील प्रत्येक शेराच्या दुसया ओळीच्या शेवटी येतोच असा समान शब्दसमूह / शब्द / अक्षर! एकाच गज़लेत रदीफ़ कधीही बदलत नाही. ती मतल्यात दोन्ही ओळीत व इतर शेरांच्या दुसया ओळीत आलीच पाहिजे. रदीफ़च नसलेली गज़ल असू शकते. त्याला गैरमुरद्दफ़ गज़ल असे म्हणतात. रदीफ़ कधीही नुसता स्वर असू शकत नाही. ते किमान एक ’सुट्टे’ अक्षर तरी असतेच.
२. काफ़िया म्हणजे मतल्यातील दोन्ही ओळीत व पुढील प्रत्येक शेराच्या दुसया ओळीत रदीफ़च्या आधी येणारा एक शब्द , ज्यातील शेवटचे किमान एक अक्षर समान असून त्या आधीची अक्षरे भिन्न असतात किंवा एक स्वर! काफ़ियातील ’समान’ अक्षरांच्या आधीची अक्षरे बदलू शकतात. जसे उधार, करार, सुमार यात ’आर’ समान आहे व उधा, करा, सुमा अशी भिन्न अक्षरे आहेत. मात्र स्वरकाफ़िया असेल तर फ़क्त काफ़ियाच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षराचा फ़क्त स्वरच समान असावा लागतो. मतल्यात दोन्ही ओळीत एकच काफ़िया घेता येत नाही. तसा तो घेतल्यास तो रदीफ़चाच भाग धरला जाईल. मतल्यात दोन्ही ओळींमधे दोन भिन्न काफ़िये घेणे आवश्यक आहे. पुढील शेरांमधे मतल्यातील एखादा काफ़िया पुन्हा आला तरी चालतो. मतल्यातील दोनपैकी एक काफ़िया पुढील सर्व शेरांमधे वापरला तरी तांत्रिकदृष्ट्या योग्यच आहे. मात्र, त्यात रंगत नाही. काफ़िया हा गज़लेचा आत्मा असून काफ़ियावर गज़लेचे बरेचसे सौंदर्य अवलंबून असते. काफ़ियाचा शब्द / स्वर हा गज़ल समेवर आल्याची भावना निर्माण करतो.
अलामत - गज़लेला तांत्रिकदृष्ट्या सुंदर बनवण्याचे काम काफ़ियामधील एक विशिष्ट स्वर करतो, त्याचे नाव अलामत! भटसाहेबांनी याला स्वरचिन्ह असे नाव दिलेले आहे.
Friday, 26 October 2018
गझल २०
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment