उदाहरणे:
अहमदनगर - या शब्दातील प्रत्येक अक्षराची मात्रा एकच आहे. त्यामुळे एकूण मात्रांची संख्या झाली ७!
पुणे - या शब्दातील पु या अक्षराची मात्रा एक तर णे या अक्षराच्या मात्रा दोन - एकूण मात्रा - ३!
मुंबई - मुं या अक्षराच्या मात्रा २, ब या अक्षराची मात्रा १ तर ई या अक्षराच्या मात्रा २ - एकूण मात्रा - ५
सोलापूर - या शब्दातील सो च्या २, ला च्या २, पू च्या २ तर र ची १ मात्रा - एकूण मात्रा - ७
औरंगाबाद - औ (२), रं (२), गा (२ ), बा (२), द (१) - एकूण मात्रा ९
पांडुरंग - या शब्दात पा हे अक्षर ’आ’ या स्वराचेही आहे व त्यावर अनुस्वारही आहे. तरीही त्याच्या मात्रा दोनच! तीन मात्रा होऊ शकत नाहीत. पां (२), डु (१), रं(२), ग(१) - एकूण मात्रा - ६
साध्या अक्षरांच्या मात्रा कशा मोजायच्या ते आपण पाहिले.
मात्र, जोडाक्षरांबाबत नियम जरा बदलतो.
ज्या शब्दात जोडाक्षर आहे त्या जोडाक्षराआधीचे अक्षर जर लघू असेल तर ते दीर्घ मानले जाते.
उदाहरणे:
आकर्षण - या शब्दातील ’क’ खरा तर लघू आहे. पण ’र्ष’ मधील ’अर्ध्या र’ चा भार ’क’ वर पडतो. म्हणजे, उच्चार करताना ’कर’ ( पूर्ण क व अर्धा र) असा केला जातो. त्यामुळे, या लघू क च्या मात्रा दोन होतात. तो गुरू होतो. गंमत म्हणजे ’र्ष’ हे अक्षर स्वत: जोडाक्षर असून त्याचा उच्चार करताना मात्र ’अर्धा र’ क बरोबर उच्चारला गेल्यामुळे ’उर्वरीत’ जो ’ष’ राहतो त्याची मात्रा एकच होते. एकूण मात्रा - आ (२), कर (२), ष (१) व ण (१)! = ६
विश्वास - यातील वि हे अक्षर लघू अक्षर आहे. पण श्वा मधील श चा भार त्यावर पडल्यामुळे ते गुरू झाले. ’विश’ असा उच्चार झाला. जो उच्चार करायला दोन मात्रांचा कालावधी लागला. श्वा मधील उर्वरीत ’वा’ हा उच्चाराचा भाग मुळातच दोन मात्रांचा आहे कारण त्याचा स्वर ’आ’ आहे. त्यामुळे विश (२), वा (२), स(१) = एकूण मात्रा - ५
निर्धास्त - यातील ’नि’ लघू आहे, पण ’र्धा’ या अक्षरातील ’र’ चा भार त्याच्यावर पडल्यामुळे ते गुरू झाले. त्याच्या मात्रा झाल्या दोन! मात्रा म्हणजे उच्चार करायला लागणारा कालावधी! ’निर’ असा उच्चार करायला दोन मात्रांचा कालावधी लागला. उच्चारामधील उरवरीत ’धा’ मुळातच दोन मात्रांचा आहे कारण त्याचा स्वर ’आ’ आहे. या ’धा’च्या पुढे ’स्त’ हे जोडाक्षर आहे. त्यातील ’अर्ध्या स’च्या उच्चाराचा भार जरी ’धा’ वर पडत असला तरी मुलातच ’धा’ हे अक्षर दोन मात्रांचे असल्यामुळे त्याच्या मात्रा बदलत नाहीत, त्या दोनच राहतात. आता ’स्त’ मधील अर्ध्या ’स’ चा उच्चार ’धा’ या अक्षराने ढापल्यामुळे बिचाया ’स्त’ कडे उच्चारायला फ़क्त ’त’च राहतो. त्यामुळे त्या अक्षराच्या मात्रा होतात १! एकूण मात्रा निर (२), धास (२), त (१) = ५
शल्य - या शब्दातील ’ल्य’ मधील ’अर्धा ल’ श बरोबर उच्चारला जात असल्यामुळे श च्या मात्रा दोन तर उरलेल्या ’य’ ची मात्रा एकच! एकून मात्रा शल (२), य (१) = ३
आपण पाहिले की:
जोडाक्षराच्या आधी जर लघू अक्षर असेल तर त्याच्या मात्रा दोन होतात, जर गुरू अक्षर असेल तर त्याच्या मात्रा दोन असतात त्या दोनच राहतात. लघू अक्षरात अर्धा उच्चार केला गेल्यामुळे जोडाक्षरातील उर्वरीत भाग हा ’अ, उ’इ’ या स्वरांपैकी असेल तर त्या उर्वरीत भागाची मात्रा होते एक! म्हणजे, उर्वरीत भाग जर ’लघू’ असेल तर त्याची मात्रा एकच उरते.
Friday, 26 October 2018
गझल ८
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment