. *माय*
घडविते नशिबाला
खडी फोडून उन्हात
आग ओकणारा सूर्य
तेव्हा लाजतो मनात
भोग जन्माचे भोगता
मनगटात विश्वास
कष्ट कष्ट आणि कष्ट
करी माय दिसमास
हाती घेतला हातोडा
आग पोटाची शमाया
संसाराच्या उभारणी
रोज झिजविते काया
"माये पोरा हाती दे गं
पाटी पेन्सिल शिकूदे
तुझ्या कष्टाच्या मोलानं
त्याचं नशीब घडूदे"
*© रमेश कुरलीकर*
No comments:
Post a Comment