रतीब घालतो आहे रोजच
घ्या हवे तर घेऊ नका
दूध आहे की भेसळ सारी
उगाच शंका घेऊ नका
धंदा अथवा शौक म्हणा ना
इमानाने जपतो आहे
रोज ग्रुपवर काहीबाही
नियमितपणे टाकतो आहे
पैसे थोडेच मागितले मी !
की मागितली प्रतिक्रिया?
स्वानंदासाठी मी लिहितो
का शक्ती घालवता वाया ?
स्वातंत्र्याचा उपभोग हा
असा घ्यायचा आहे मला
असेल तेवढी अंगामधली
मांडत आहे माझी कला
का तुमच्या दुखते पोटात
काय समजता स्वत:स आपण
असेल हिंमत लिहून दाखवा
एक कविता कराच अर्पण
No comments:
Post a Comment