मी प्रेमाच्या गल्ली समोरच राहात होतो
एका हसऱ्या कळीस नेहमी पाहात होतो.
बघता-बघता त्याही कळीचे फूल झाले
बरोबरीच्या बाप्याला एक मूल झाले
तिला एकदा चोरून मी मग पत्रही लिहिले
हाती द्यायचे धाडस कधीही नाही झाले
सगे सोयरे माझे सारे निष्ठूर झाले
मित्रांनी लग्नात तिच्या मज भटजी केले
हनुमंताचा भक्त म्हणऊनी गामा झालो
अन् वर्षातच घेऊन पदवी मामा झालो
आता भेटतील त्या ज्या सगळ्या गल्लीत होत्या
@ *चाँद परछाई*
No comments:
Post a Comment