*हृदयातलं काहीतरी.........*
*(गजानन ऊफाडे यांची क्षमा मागून)*
विसरलो न मी ती पहिली नजर
विसरलो न मी तो काळजात घुमणारा गजर
विसरलो न मी ती पहिली भेट
विसरलो न मी तिचे काळजात घुसणे थेट
विसरलो न मी ती पहिली मिठी
विसरलो न मी काय काय केले तिच्यासाठी
विसरलो न मी ती दोघांनी खाल्लेली एकच कॅडबरी
विसरलो न मी ती ओढ लागलेली अंतरी
विसरलो न मी तिच्यावर केलेली हर एक कविता
विसरलो न मी तिच्यासाठी बापापुढे झुकवलेला माथा
विसरलो न तिच्या घराची वाट
विसरलो न मी ती उधाण प्रेमाची लाट
विसरलो न मी तिच्या कुशीतला गारवा
विसरलो न मी तिजसाठी झुरणारा मन पारवा
विसरलो न मी तिचं माझ्यासाठी झुरणं
विसरलो न मी तिला चोरून काॅल करणं
विसरलो न मी तिचं बदललेलं रुप
विसरलो न मी तिच्या धोक्याचा हुरुप
विसरलो न तो तिच्या लग्नाचा क्षण
विसरलो न मी तिने परत न केलेलं मन
विसरलो न मी ती शेवटची दूर गेलेली
विसरलो न मी ती इच्छेविरूद्ध कुणाची तरी झालेली
विसरलो न मी तिच्यासाठी जागलेली एक एक रात्र
विसरलो न मी तिने शेवटी निभावलेलं कुणाच्या तरी बायकोचं पात्र
विसरलो न मी ती वळताना झालेले हाल
चाँद विसरलो न रे मी "शोन्या पुढील जन्मी तरी होशील का माझा ?" हा तिने शेवटी केलेला सवाल... ..😭
©🖋 *चंद्रकांत निकाडे*
9922314564
No comments:
Post a Comment