Tuesday, 21 May 2019

वाद नको संवाद हवा


वादाने या घरेही फुटली
परक्यांनी सरकारे लुटली
दृढ रक्ताची नाती तुटली
असे कोणती यास दवा

इतिहासाची साक्ष असे
वर्तमान उमटवी ठसे
भविष्य त्यातून सुटत नसे
सारासार विचार हवा

अविचाराने होतो घात
अज्ञाने शक्तीचा पात
सत्य करूनी घेता ज्ञात
मिळे जीवना अर्थ नवा

No comments:

Post a Comment