ज्ञानाची ओवी जितकी मजला प्यारी
तितकीच असे भावंडाची ललकारी
गाईन उद्याचे घेऊन तिजला गाणे
कवी कवयित्रींना सलाम सन्मानाने
काळोख्या रात्री शब्दच माझे साथी
मी वेड बाळगून कवीचे वळतो वाती
नि म्हणतो त्याला माझा गुणदोषांसह
मग कसली ईर्षा, हार-विजय अन् तह
माझा तो बाब्या रीत नसे ना बरी
जे बरे तेच माझे ही वृत्ती खरी
झटकली धूळ तर निघेल उजळून तोही
हा बाणा माझ्या नित्य
जपून मी हृदयी
त्यांच्या पंखातील बळ मजला ताराया
हो बीज मानतो, घेतो नित पेराया
जे फुगले बेडूक अहंकार उरी भरुनी
सांगा जातील का पैलतीरावर तरुनी
No comments:
Post a Comment