. पन्हाळा तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज २३ जून २०१९ रोजी सौ.मंगल रामचंद्र पाटील. राहणार उत्रे, तालुका पन्हाळा. या महिलेचे प्रबोधन करुन जटानिर्मून केले. पन्हाळा तालुका अंनिस उपाध्यक्ष दिनकर चौगले राहणार पोर्ले यांच्या घरी गीता हासूरकर, सुजाता म्हेत्रे, प्रा.प्रमिला भोसले, मंगल पवार यांनी जटा निर्मूलन केले. जटानिर्मूलन झाल्यानंतर सौ.मंगल पाटील यांना साडी चोळी व त्यांचे पती रामचंद्र पाटील यांचा टाॅवेल,टोपी व नारळ देऊन सन्मान करण्यात आला.
उत्रे येथील सौ.मंगल पाटील या आपल्या डोक्यावर जटाचे ओझे घेऊन फिरत होत्या. देवीचा प्रकोप होईल, घरातील इतर लोकांना त्रास होईल. अशी भीती अनेकांनी दाखवल्याने त्यांनी आजपर्यंत केसांच्या जटा वाढविल्या होत्या. अंनिसने प्रबोधन केल्याने त्या जटा निर्मूलन करण्यासाठी तयार झाल्या. यावेळी अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष विनायक चव्हाण म्हणाले 'केसाची निगा व्यवस्थित राखली नसल्याने जटांची वाढ होते. अजूनही समाजात काही महिलांमध्ये अंधश्रद्धा आहे. त्यासाठी अंनिसतर्फे प्रबोधनाची मोहीम सुरू आहे.' 'जटा काढल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा देवीचा कोप होईल ही भीती मनातून काढून टाकावी. 'उच्चशिक्षित, समाजातील स्त्रियांच्या केसात जटा कधीच नसतात. तर त्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागासलेल्या व बहुजन समाजातील अशिक्षित, अज्ञानी महिलांमध्ये दिसतात. तेव्हा जटा असणाऱ्या महिलांनी जटामुक्त व्हावे व आपला त्रास नाहीसा करावा.'
यावेळी शिक्षक विष्णू थोरबोले, महाराष्ट्र अंनिस राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती, राज्य कार्यवाहक रमेश माणगावे, जिल्हा प्रधान सचिव दिलीप कांबळे, प्रमोद म्हेत्रे, रमेश वडणगेकर, चंद्रकांत निकाडे, संजय कळके, तुषार चोपडे, सरदार शिंगाडे, प्रमोद शिंदे, अनिल शेलार, राजवैभव रामचंद्र, यश आंबोळे, तानाजी कुरळे आदी उपस्थित होते.
Thursday, 27 June 2019
Hat Trick
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment