Friday, 5 July 2019

पुरस्काराची उंची वाढविणारा सन्मान

*पुरस्काराची उंची वाढविणारा सन्मान*

                    सडेतोड विचार, स्पष्ट वैचारिक   बैठक,   सखोल  अभ्यास, शिक्षण   क्षेत्रातील  समस्यांची  जाण, अन्यायाविरुद्ध चीड, सामान्याविषयी कळवळा,    सतत    मदतीसाठी पुढे असणारा   हात.   अशा  जाणिवांतून डोळ्यांत        झणझणीत       अंजन घालणाऱ्या       किंवा       प्रामाणिक जाणिवेने    काम  करणाऱ्यांचे पुरेपूर कौतुक    करणाऱ्या,  असंख्य    पोष्ट आपण आजवर  व्हाॅटसप व फेसबुक या माध्यमातून वाचलेल्या आहेत.   
            ज्यांच्या उत्साही स्वभावातून या पोष्ट  अवतरलेल्या ते एक निस्पृह, निरपेक्ष निवृत्त अधिकारी,समाजभान असलेले   आणि   इतरांनाही   जागृत करणारे   व्यक्तिमत्व,  जाणते  समाज शिक्षक.
                      खेळ व मनोरंजनातून प्रज्ञाशोध,सगुणातील ईश्वर, शोधांच्या जन्मकथा,    नजराणा,  बाप समजून घेताना,       मुले     समजून   घेताना, पणत्यांचा   प्रकाश अशा पुस्तकांतून संवेदनशील विचार मांडणारे लेखक,पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे वक्ते,सुऱ्हदयी   मित्र-मार्गदर्शक, श्री संपत गायकवाडसाहेब.
                     महाराष्ट्रात तळमळीने कार्य   करणाऱ्या  बऱ्याच सामाजिक संस्थांकडून  त्यांना  आजवर असंख्य पुरस्कार दिले गेले. तो त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा सन्मानच आहे.
              सन्मानांच्या या प्रभावळीत  मुख्याध्यापक  संघ,   शिवाजी  पार्क, कोल्हापूर   येथे  ६ जुलै,२०१९ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा ग्रंथालय संघ व  कोल्हापूर विभागीय ग्रंथालय संचालक   यांच्या   संयुक्त   विद्यमाने संपन्न  होणाऱ्या  समारंभात  डाॅ.एस आर रंगनाथन  पुरस्काराने  सन्मानित करण्यात   येत   आहे. या समारंभास हार्दिक शुभेच्छा !!!

No comments:

Post a Comment