🙏🙏 *गुरू* 🙏🙏
गुरू आकाशीचा ध्रुव
गुरू आनंदाचे पर्व
गुरूच शीर्ष अथर्व
सर्वकाळी
गुरू दैवतांचे दैव
गुरू अंतरीचा भाव
गुरू पूर्णत्वाचे नाव
सर्वभूता
गुरू कैवल्याचे धाम
गुरू चैतन्याचे ग्राम
गुरू जीवनाचे मर्म
जाणत्याशी
गुरू महिमा अपार
गुरू संचिताचे सार
गुरू मुक्ती माझ्या चार
निसंशय
गुरू शाश्वताचे धन
गुरू आनंदाचा घन
गुरू चरणी वंदन
नम्र माथा
गुरू चांदण्याची आभा
गुरू लावण्याची शोभा
गुरू *चंदनाचा* गाभा
शीतलसा
*© रमेश*
No comments:
Post a Comment